Marathi Blog

Marathi Kavita

खरडय़ाची खरडपट्टी

खरडय़ाची खरडपट्टी बारामतीकर सहसा कुणाला खेटत नाहीत. केवळ खरडा भाकर खाऊन म्हणे प्रश्न सुटत नाहीत. सातार्‍याच्या खरडाभाकरीची बारामतीकडून खरडपट्टी आहे! जास्त काही विचारू नका तुमची आमची कट्टी आहे!! – सूर्यकांत डोळसे http://orkut .google. com/ c826350-t9a1a5b1b7371cfc3.html

घे विसावा जरा

घे विसावा जरा धावते नदी बये थांबशील का कधी? घे विसावा जरा सांगतो महोदधी. वाहणे तुझ्यापरी वात तोचि जाणतो, तो हि तू हि जीवनास जीवनात आणतो. काय रे हे जीवना तू अखंड वाहतो, दु:ख ते जगायचे मरेपर्यंत साहतो. घे विसावा जरा मी तुला म्हणू कसा! चालण्याचाच तू घेतलास रे वसा. —————————————- सारंग भणगे http://orkut.g oogle. […]

त्यांची ओळख

त्यांची ओळख शब्द कसे फिरवावेत यात ते माहिर आहेत. त्यांनी खुपसलेले खंजीर तसे जगजाहीर आहे. त्यांच्या फिरवाफिरवीचे डावपेच मुत्सद्दीपणाचे वाटले जातात! त्यांचा आदर्श घेऊनच गवताला भाले फुटले जातात!! – सूर्यकांत डोळसे http://orkut. google. com/ c826350-tf6c8ca3f1d39ce9d.html

आसवांचे हसू ….

आसवांचे हसू …. कधी तरी त्या आठवणीन्नी यायचे ओठावरी ते हसू त्याच आठवांनी कधी तरी डोळ्यात यायचे आसूं सुखदुख्खाचे असे प्रदर्शन जगा लागले दिसू राधा कृष्ण अद्वैताते त्या जग़ लागले हसू राधा संगे कृष्ण सख्याते नकोस मजला दिसू शिकेन जगणे तुजवीण ते पिऊनी डोळ्यामधले आसू ना दिसलास जरी आता घेईन पिऊन आंसू राधा कृष्ण अद्वैताचे […]

धार्मिक दलाली

धार्मिक दलाली ज्याचा त्याचा धर्म ज्याने त्याने पाळला पाहिजे. इतरांचा नाही, पण आपला धर्म कळला पाहिजे. प्रत्येक धर्माभोवती दलालांचे विषारी वेटोळे आहे! दलालांच्या दलालीमुळेच चांगल्या धर्माचे वाटोळे आहे!! – सूर्यकांत डोळसे http://orkut. google. com/ c826350-tdc3580083854881d.html

ममताशून्य रेल्वे अर्थसंकल्प

ममताशून्य रेल्वे अर्थसंकल्प लालू तर चालूच होता बॅनर्जींनाही ममता नाही. जरा रेल्वे अर्थसंकल्प बघा तुम्हांलाही दिसेल समता नाही. आपलाच दाम खोटा, म्हणूनच असे फसवित आहेत ! मुंबईत परप्रांतीयांचे लोंढे डब्या-डब्याने घुसवित आहेत !! -सूर्यकांत डोळसे http://orkutv.google.vcom/ c826350-t44d52dfc15ed89f.html

सेतुनामा

सेतुनामा पुलाचे ठेवा,मुलाचे ठेवा वाटलेच तर बापाचे ठेवा. निष्टा दर्शविण्यासाठी नावचं गांधीछापाचे ठेवा. आम्हांला’गांधी’ची ऍलर्जी नाही ती तुमच्या लाळघोटेपणाची आहे ! तुम्हीच खोटेपणा करता; चर्चा मात्र,आमच्याच वैचारिक छोटेपणाची आहे !! -सूर्यकांत डोळसे http://orkut .google .com/ c826350-t44d52dfc15ed89f.html

विठ्ठ्ला ss पांडूरंगा !

विठ्ठ्ला ss पांडूरंगा ! पंढरीच्या वाटेवरी भडकवली मस्तकं जुनीच पुस्तकं उचकुन ॥१॥ वड्याचे तेल वांग्यावर प्रकार हे सुरू कोण कुणाचे गुरू? जगजाहिर ॥२॥ भोळे वारकरी त्यांच्या भक्तीची लुट पडली फुट दिंड्यांमध्ये ॥३॥ तुझ्याच भक्तांना तुच सांग पांडूरंगा नको हा दंगा भक्तीसोहळ्यात ॥४॥ -सूर्यकांत डोळसे http://orkut .google. com/ c826350- t44d52dfc15ed89f.html

दोघांत तिसरा…..

दोघांत तिसरा….. युतीच्या संसारातला हा टर्निंग पॉंईट म्हणूया. धनुष्य़बाण म्हणाला कमळाला, आता दोघात तिसरा आणूया. एवढ्या वर्षाचे प्लॅनिंग त्यालाच आता तडा आहे ! अख्खा महाराष्ट्र जाणतो नेमका कुणामुळे हा राडा आहे !! -सूर्यकांत डोळसे http://orkut. google. com/ c826350- t44d52dfc15ed89f.html

अरे चोरांनो…….

अरे चोरांनो……. चोरली कुणाची कविता तर निदान चोरी खपली पाहिजे. कविता चोरावी अशी की, ती आपल्याला झेपली पाहिजे. चोरी ती चोरीच कधी ना कधी फुटली जाते. उंटाचा मुका घेतल्याची गोष्ट वाचकांनाही पटली जाते. इतर चोर्‍यांप्रमाणेच कवितेचीही चोरी पचत नाही ! कारण काळीज हालल्याशिवाय कविता कधी सुचत नाही !! -सूर्यकांत डॊळसे http://orkut. google. com/ c826350-t44d52dfc15ed89f.html

Previous Posts